Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, April 18, 2024

सोलापूर शहरातील भुखंड माफिया तसेच गुंड प्रवृत्तींच्या इसमांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांच्याकडुन धडाकेबाज कारवाई..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर शहरातील भुखंड माफिया तसेच गुंड प्रवृत्तींच्या इसमांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांच्याकडुन धडाकेबाज कारवाई.. 

  सोलापूर (प्रतिनिधी ):-  दि. 18/12/2023 रोजी अर्जदार नामे नागेश पेटंप्पा कंदिकटला रा. 26 सी 69 विणकर गृह उद्योग सहकारी संस्था, एमआयडीसी, सोलापूर यांनी मा पोलीस आयुक्त सो सोलापूर शहर यांना बेकायदेशीर दस्ताच्या आधारे मिळकतीमध्ये घुसखोरी करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणेबाबत कारवाई व्हावी म्हणुन अर्ज केला होता. सदरचा अर्ज एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे प्राप्त झाला. त्यानंतर अर्जाची अधिक कसून चौकशी केलेनंतर गैरअर्जदार नामे 1) शिवलाल तुळशिराम निंबाळकर वय 51 वर्षे, रा. प्लॉट नं 229, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर 2) लक्ष्मण शिवलाल निंबाळकर वय 28 वर्षे, रा. प्लॉट नं 229, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर यांचेवर गु.र.नं. 227/2024 भादवि कलम 447,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चालु आहे.

तसेच अर्जदार नामे भारत भिमा कोळी वय 67 वर्षे, व्यवसाय माजी सैनिक, रा. जमादार वस्ती प्लॉट नं 57, निलम नगर, एमआयडीसी सोलापूर मो नं 7030093257 यांनी मा पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांचेकडे अनिल सेतसंदी व वसुधा डेव्हलपर्सचे मालक बुच्यय्या गुंडेली यांनी अतिक्रमण केले आहे व जागेवरील लोखंडी बोर्ड व सिमेंट चे पोल लावलेले तार कम्पाऊंड चोरी गेले आहे याबाबत अर्ज केला होता. सदरचा अर्ज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे प्राप्त झाला. त्यानंतर सदर अर्जाची अधिक कसुन चौकशी केली असता गैरअर्जदार नामे अनिल सेतसंदी व वसुधा डेव्हलपर्सचे मालक बुच्यय्या गुंडेली यांच्याविरूध्द भादविक 447, 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त श्री अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सपोनि नंदकिशोर सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांचेकडुन बेकायदेशिर रित्या जागा बळकावुन दमदाटी करून, शिवीगाळ करण्याऱ्या गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्याविरूध्द तक्रार देण्याचे आवाहान करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस ठाणे, सोलापूर.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment