Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 11, 2024

श्री विजयवैभवलक्ष्मी मंदिर जुळे सोलापूर चा 18 वर्धापन दिन भक्तीमय वातावरणात साजरा..




 सारा न्यूज नेटवर्क - 

श्री विजयवैभवलक्ष्मी मंदिर जुळे सोलापूर चा 18 वर्धापन दिन भक्तीमय वातावरणात साजरा..

सोलापूर (प्रतिनिधी) :- जुळे सोलापूर इंडियन माॅडेल  स्कूल समोर स्थित श्री विजयवैभवलक्ष्मी मंदिराचा 18 वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



यावेळी या भागातील बहुसंख्य महिलांनी  दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा केला. त्या निमित्ताने सर्व भक्तगण यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी महिला, मुले, पुरुषभक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. 




 शुक्रवार 10 मे रोजी पहाटे 5 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत रुद्र पठणाने पंचमृताभिषेक, क्षिरिभिषेक, पंचगव्याभिषेक व त्यानंतर विशेष अलंकार महापूजा  करण्यात आली. 

सकाळी 9 वाजता महाआरती झाली.

 9.30 ते 12 होमहवन करण्यात आला. 

दुपारी 3 ते 4.30 भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या वेळी बहुसंख्य उपस्थित होत्या. 





दुपारी 4.30 ते 5.30 देवी सहस्त्र नामावली कुंकुमअर्चना

सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक (मंदिर प्रदक्षिणा) काढण्यात आली. 

सायंकाळी 6.30 दिपोस्तव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

सायंकाळी 7 नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

यासर्व कार्यक्रमाचे नियोजन मंदिराचे कार्यकारणी सदस्य सिध्देश्वर जोकारे, रामेश्वर सोलापूरे, मीनाक्षी जोकारे, शैलजा सोलापूरे, व समस्त भोगडे, जोकारे व सोलापूरे परिवार यांनी स्वत: केले. 


या कार्यक्रमास महिला व लहान मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भक्तगण सेवार्थी व मंदिर कार्यकारणी सदस्य यांनी परिश्रम घेतले. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment