Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 25, 2024

आनंदमार्ग प्रचारक संघचे संस्थापक जगतगुरु परमपिता परमेश्वर श्री श्री आनंदमूर्तीजी तथा " बाबा" यांच्या १०३ व्या जन्मोत्सव सोलापूर येथे साजरा...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

आनंदमार्ग प्रचारक संघचे संस्थापक जगतगुरु परमपिता परमेश्वर श्री श्री आनंदमूर्तीजी तथा " बाबा" यांच्या १०३ व्या जन्मोत्सव  सोलापूर येथे साजरा...

सोलापूर (प्रतिनिधी) :- आनंद पोर्णिमा २३ में रोजी आनंदमार्ग प्रचारक संघचे संस्थापक जगतगुरु परमपिता परमेश्वर श्री श्री आनंदमूर्तीजी तथा " बाबा" यांच्या १०३ वा जन्मोत्सव सोलापूर विजापूर रोड येथील नम्रता हौ. सोसायटी मधील आश्रम मध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 

हा जन्मोत्सव तीन दिवस साजरा करण्यात आला. या तीन दिवसांत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. त्यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, योगासन स्पर्धा, तांडव नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा  असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्या   स्पर्धेत मुला मुलींनी उत्साहात सहभाग नोंदवला व ह्या स्पर्धा यशस्वी केल्या. विजयी स्पर्धकांना पारितोषीक देउन गौरवण्यात आले. 


तसेच श्री श्री आनंदमूर्तीजी बाबा यांच्या १0३व्या जयंती निमित्त 103  वृक्षारोपणाचा संकल्प घेऊन इको नेचर क्लब च्या मदतीने 103 रोपे व वृक्ष लागवड करुन वेगळ्या पद्धतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 


तसेच उपस्थित अनुयायी यांना मातागुरु च्या हस्ते रोपे वाटप करण्यात आले व वृक्षारोपण करून ती झाडे मोठी करावी या बद्दल प्रोत्साहन देण्यात आले. 

आणि नारायण सेवा म्हणून सिद्धेश्वर मंदिर येथे अनाथ व गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आल्याचे संस्थेचे आचार्य सिद्धदेवानंद अवधूत यांनी सांगितले. व आश्रमात सुध्दा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी इकोनेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर व सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांची उपस्थिती होती. 

यासाठी विजय देडे, वासुदेव गोवर्धनकर, दयानंद टाकळीकर, रोहिणी जाधव, विजया मोरे, प्रकाश शिंदे, तेजस, चेतन , प्रथमेश, चेतना, चेताली, देवांनी , स्विटी, वेदांत, क्षीतीजा, आदि सर्वांना परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment