सारा न्यूज नेटवर्क -
मनस्मृतीचा शिक्षण क्षेत्रात समावेशास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा तीव्र विरोध...
सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा अभ्यास शाळकरी विद्यार्थ्यांना देण्याचा घात शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या आराखड्यात सूचना देण्यात आली असून त्याचप्रमाणे मुले आणि स्वभावृत्ति या घटकाची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यात आला असून ही एक प्रकारे बाल विद्यार्थ्यांच्या मनावर जातीयवादाची विष पेरणे समाजामध्ये तेढ निर्माण करणे अशा या शासनाचा म्हणजे घेतलेल्या निर्णयाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने तीव्र निषेध करत असून हा निर्णय शासनाने रद्द न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून तीव्र आंदोलन करणार असून त्यासोबतच या प्रश्नांमध्ये जर बीजेपी आणि आरएसएस मोठ्या प्रमाणात दाखल घेत असेल त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी आमची असल्याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलेले आहे.
तेव्हा शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब हा निर्णय रद्द करावा खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी मनस्मृती दहन केलं त्याच दिवशी मनस्मृतीचा विषय संपलेला आहे तरीसुद्धा या देशांमध्ये आरएसएस सारखी माणसं या देशांमध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा हा डाव हाणून पाडण्यासाठी राज्यातील तमाम आंबेडकर प्रेमी जनता महिला स्त्रिया तसेच पूर्वगामी विचारसरणीच्या लोकांनी या घटनेला विरोध करवा अन्यथा मनुस्मृतीचे हे भूत आपल्या मानगुटी वर बसवल्याशिवाय हे लोक बसणार नाहीत त्याचा बळी देण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पुढे करण्यात आलेला आहे तेव्हा या दोघांनी सुद्धा या छुप्या अजेंडापासून सावध राहावं देश 2000 वर्षे पाठीमागे जाण्यापूर्वी वाचवावा व या ठिकाणी पूर्वगामित्व प्राप्त करण्यासाठी या दोघांनी भाजप आणि आरएसएस च्या कोणत्याही प्रकाराला बळी न जाता जनतेच्या न्याय हक्कासाठी हा निर्णय मागे घेण्यात यावे अशी रिपब्लिकन इंडिया व अल्पसंख्याक विभागच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आलेले आहे
यावेळी प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे साहेब रावसाहेब प्रक्षाळे माणिक आठवले सलीम मुल्ला मारुती सोनवणे धर्मा माने बापू लोंढे सिकंदर शेख इब्राहिम शेख इमरान शेख समीर मुजावर मेजर साबळे कल्लाप्पा बनसोडे इरफान कल्याणी आधी पदाधिकारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment