Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, May 19, 2024

अकोले (मंद्रुप) येथे श्री नृसिंह जयंतीउत्सव निमित्त भव्य जंगी निकाली कुस्त्याचें मैदान ; संयोजक रमेश (आण्णा)आसबे यांचे कुस्तीपटु यांना प्रोत्साहन..



 सारा न्यूज नेटवर्क -

अकोले (मंद्रुप) येथे श्री नृसिंह जयंतीउत्सव निमित्त भव्य जंगी निकाली कुस्त्याचें मैदान ;

संयोजक रमेश (आण्णा)आसबे यांचे कुस्तीपटु यांना प्रोत्साहन..

सोलापूर (प्रतिनिधी) :- अकोले (मंद्रुप) ता. दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे श्री नृसिंह जयंतीउत्सव निमित्त भव्य जंगी निकाली कुस्त्याचें स्पर्धा दिनांक 22/05/2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील कुस्तीगीरांचे मनोबल उंचावण्यासाठी अशा स्पर्धा होणे गरजेचे असून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे हे माध्यम असून यासाठी या कुस्त्यांचें आयोजन केले आहे तरी या निकाली जंगी कुस्तीं पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे संयोजक रमेश (आण्णा) आसबे यांनी सांगितले.


या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून 

श्री बजरंग (अप्पा) मेकाले (महा. राज्य तलाठी संघटना उपाध्यक्ष)

श्री चंद्रकांत (काका) वानकर (पाणीवेस तालीम)

बक्षीस समारंभ

श्री किसनराव (अण्णा) मेकाले (शहर कॉग्रेस उपाध्यक्ष)

श्री नामदेव (भाऊ) आसबे (प्रगतशील बागायतदार)

व हिंदकेसरी सुवर्ण पदक पै. भरत मेकाले यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

खालील मान्यवरांकडून बक्षीस इनाम जाहीर.

1) समस्त ग्रामस्थ यांच्या तर्फे इनाम 1,51,000/ रूपये 

2) बजरंगआप्पा मेकाले यांच्या तर्फे इनाम 1,00001/ रुपये 

3) सदानंद काका गायकवाड व रेवणआबा गायकवाड यांच्या तर्फे इनाम 75,000/ रुपये 

4) संतोष (भाऊ) पवार मार्ग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या तर्फे इनाम 51,000/रुपये

या निकाली जंगी कुस्ती मध्ये महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील अनेक नावाजलेले कुस्तीपटू उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ अकोले (मंद्रुप) यांनी या न्युज च्या माध्यमातून केले आहे. 

या कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा, 

1) परमेश्वर सुरवसे              2) राजु पाटील 

मो. 9552495151             मो. 9822406422


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment