Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, May 29, 2024

श्री शिलवंती देवीयात्रे मध्ये मारहाण प्रकरणी सरपंच माळप्पा पुजारी व इतर सात जणांची निर्दोष मुक्तता..


 

सारा न्यूज नेटवर्क

श्री शिलवंती देवीयात्रे मध्ये मारहाण प्रकरणी सरपंच माळप्पा पुजारी व इतर सात जणांची निर्दोष मुक्तता..

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- ग्रामदैवत श्री शिलवंती देवीयात्रा गुढीपाडवा सणामध्ये मारहाण केल्याप्रकरणी सरपंच माळाप्पा पुजारी व इतर सात जण रा. गुरववाडी, अक्कलकोट जि. सोलापूर यांची प्रथम न्यायदंडाधिकारी श्री गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी कि इ. स. २०१२ मध्ये मौजे गुरववाडी, ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथे गुढीपाडवा सणामध्ये श्री ग्रामदैवत श्री शीलवंती देवी यांची यात्रा भरते. त्या वेळी गावचे सरपंच माळप्पा पुजारी इतर सात जण रा. मौजे गुरववाडी तालुका अक्कलकोट सोलापूर यांची गावातील श्रीमंत मल्लेश विंचुरे (बसुगोळ)  इतर लोकांना बरोबर मारहाण केली म्हणून कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अक्कलकोट (दक्षिण) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन व दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले. आज पर्यंत त्या खटल्याच्या तारखा न्यायालयात चालू होत्या.

 बारा वर्षा नंतर आज रोजी, २७.५.२०२४ रोजी न्यायालयात न्यायाधीश श्री गायकवाड यांच्या कोर्टात निकाल जाहीर झाला. 

सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले.आरोपीतर्फे अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले. सदर बाबींचा विचार करून मा न्यायाधीश श्री गायकवाड यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली .त्यामध्ये माळप्पा पुजारी वगैरे सात लोकांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये आरोपींतर्फे अँडव्होकेट विजय हार्डीकर यांनी काम पाहिले.

न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर व सरपंच माळप्पा पुजारी व इतर सात लोकांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सरपंच माळप्पा पुजारी व इतरांना पेढा भरऊन अभिनंदन केले. 


 तसेच अक्कलकोट तालुका महिला कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शितलताई म्हेत्रे यांनीही सरपंच माळप्पा पुजारी यांना पेढा  भरऊन स्वागत व अभिनंदन केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment