सारा न्यूज नेटवर्क -
ब्रेकींग:- रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या विजापूर नाका पोलिसांनी आवळल्या मुसक्या ;
६ तासाच्या आत घरफोडीचे ३ गुन्हे उघडकीस….
सोलापूर (प्रतिनिधी) :- विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतल दाखल घरफोडीच्या घटनास्थळावरील प्राप्त सी.सी.टी. व्ही. फुटेज विश्लेषन करून तांत्रिक माहिच्या आधारे रेल्वे स्टेशन सोलापूर येथे सापळा रचुन कल्याण ठाणे येथील सराईत आरोपी नामे सॅमसन रुबीन डॅनियल वय २५ वर्षे, रा. बेतुरकरपाडा, क्लॉलिटी कंपनी, डॅनियल हाऊस, रूम नं. ५, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे यास ०६ तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार साो, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) श्री विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त वि२ श्री अजय परमार सो, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दादा गायकवाड सो, पोनि श्रीमती संगिता पाटील साो (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/शितलकुमार गायकवाड, पोहेका / सचिन हार, पोना/गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकों/संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, पोकों/हरिकृष्ण चोरमुले यांनी पार पाडली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment