Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, May 27, 2024

जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राम हुंडारे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान..



 सारा न्यूज नेटवर्क - 

जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राम हुंडारे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान.. 

  सोलापूर (प्रतिनिधी ):-  जनता संघर्ष न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम समाजकल्याण केंद्र रंगभवन, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.


 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर व जेष्ठ साहित्यिका प्रा. नसीमा पठाण ह्या होत्या. 

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां सुवर्णाताई झाडे खेलबुडे, राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर (निवेदिका), शाहीर सुरेश खाडे, मा. पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे, तंटामुक्त अध्यक्ष (होटगी स्टेशन) सुरेश (अण्णा) डवले, इको नेचर क्लबचे डॉ मनोज देवकर, संगाप्पा कांबळे मुख्य संपादक (लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेल) सोशल वर्कर विद्या माने यांची उपस्थिती होती. 


यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांना पत्रकारीता मधील कार्या करिता जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यांना सन्मान पत्र सन्मान चिन्ह व झाडाचे रोप गुलाबपुष्प देऊन  प्राध्यापक प्रेमचंद मेने (उपाध्यक्ष राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 



इको नेचर क्लब व सारा न्यूज कडून भडकुंबे दांपत्याचा डॉ मनोज देवकर राम हुंडारे यांच्या हस्ते रोप देवून शुभेच्छा देण्यात आल्या. 


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment