Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, May 28, 2024

पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने अनाथाश्रमाला "माणुसकीच पाठबळ " दिले शैक्षणिक साहित्य भेट..


 सारा न्यूज नेटवर्क - 

पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने अनाथाश्रमाला "माणुसकीच पाठबळ " दिले शैक्षणिक साहित्य भेट

इचलकरंजी(प्रतिनिधी) :- पोलिस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने तोरणानगर,इचलकरंजी येथील नवचैतन्य अनाथाश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देत "माणुसकीच पाठबळ" दिले. पोलिस मित्र असोसिएशनच्या या उपक्रमाने मुलांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. आश्रमातील 50 मुलांना वह्या,पेन  आणि खाऊ वाटप करण्यात आले.

पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य महिला अध्यक्षा डॉ रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने "माणुसकीच पाठबळ" या उपक्रमातून अनाथाश्रमातील मुलांना सहकार्य केले.यावेळी नवचैतन्य अनाथाश्रमाचे व्यवस्थापक महादेव माने सर यांनी संस्थेच्या कार्याविषयी आणि मुलांचे संगोपन कशाप्रकारे केले जाते याविषयी माहिती दिली तसेच पोलिस मित्र असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश शिर्के यांनी असोसिएशनचे कार्य विषद केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांनी अनाथाश्रमातील मुलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत स्वतःचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल करावे.व्यसनाधीनता आणि वाममार्गाला लागून आयुष्याचे नुकसान करू नये असे आवाहन करत आश्रमाला इथून पुढच्या काळात शासकीय स्तरावर लागेल ती मदत करायला तयार असल्याचे सांगितले.राज्य महिला अध्यक्षा डॉ रजनीताई शिंदे यांनी मुलांची अगदी आस्थेने चौकशी करत प्रेमाची भावना व्यक्त केली.यावेळी राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार,प्रमुख सल्लागार मुरलीधर शिंदे,टीम प्रमुख मिलिंद चव्हाण,उप टीम प्रमुख अनिकेत गुरव,विष्णु नवाळे,अमित कोरे, 


इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा आशा वाघिरे, सचिव संगीता रुग्गे,उपाध्यक्ष सरस्वती हजारे,शकुंतला पाटील, मनीषा आवळे,शीतल पाडळकर,सविता पुजारी, सुनीता पवार,विद्या लवटे, स्वाती जाधव, राजश्री बडवे, गुलबक्षी बागवान,विठ्ठल झोरे,अरुण राठोड आदी पदाधिकारी, सदस्य व टीम उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment