Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, May 28, 2024

कोल्‍हापुरात एशिया इंडो शिखर परिषद सन्‍मान सोहळ्यात महिला बचत गटांचा पुरस्कार देऊन सन्मान..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

कोल्‍हापुरात एशिया इंडो शिखर परिषद सन्‍मान सोहळ्यात महिला बचत गटांचा पुरस्कार देऊन सन्मान.. 

कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) : - युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, भारत व इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट  यांच्‍या विद्यमाने एशिया इंडो शिखर परिषद सन्मान सोहळा  शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे  संपन्‍न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्‍ज्‍वलन सर्वच पाहुण्यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.  या सोहळ्यात यशाच्या उत्तुंग आभाळात आणखी नवी क्षितिजे काबीज करून आपल्या क्षेत्रात अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा व उदंड शक्ती निर्माण करणाऱ्या महिला बचत गटांचा गौरव जेष्ठ अभिनेते टीव्ही कलाकार सुनील गोडबोले यांच्‍या शुभहस्‍ते पुरस्‍कार देऊन करण्यात आला.  

या बचत गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रामुख्याने रजनी संगीता बचत गट इचलकरंजी, राजलक्ष्मी बचत गट फुलेवाडी(कोल्हापूर),सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहाय्यता समूह,ऐकोंडी(ता.कागल),श्री नृसिंह महिला बचत गट ठिकपूर्ली(ता.राधानगरी),सद्गुरू महिला बचत गट सोलगे मळा इचलकरंजी,हिरकणी स्वयं सहाय्यता महिला बचत गट, मधुबन सोसायटी सांगली नाका इचलकरंजी,शिंदे मळा महिला बचत गट खोतवाडी तारदाळ, संत रोहिदास विकास फाऊंडेशन महिला बचत गट इचलकरंजी या महिला बचत गटांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल आणि फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.या बचत गटांना डॉ रजनीताई शिंदे यांचे सहकार्य लाभले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेध फाउंडेशन इचलकरंजीच्या अध्यक्षा डॉ रजनीताई शिंदे आणि न्यूज आखाडाचे जेष्ठ पत्रकार विनोद नाझरे, त्याचबरोबर कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक माननीय सदानंद सदानशिवे आणि मुरबाड ,ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक श्री दिनेश उघडे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत समृद्धी प्रकाशन संस्‍थेचे अध्यक्ष, डॉ. बी. एन. खरात यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment