Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, May 24, 2024

नान्नज आणि गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर येथे निसर्ग अनुभवासह प्राणी गणना संपन्न ;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

नान्नज आणि गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर येथे निसर्ग अनुभवासह प्राणी गणना संपन्न.

अभयारण्यातील कृत्रिम पाणवठ्यावर पाणी पिताना आढळली माळढोक ची मादी.

सोलापूर (प्रतिनिधी) :- प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर कार्यालयाचे आदेश आणि मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग, पूणे कार्यालयाच्या सुचनेनुसार माळढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून अभयारण्य परक्षेत्रात निसर्ग अनुभव आणि प्राणी प्रगणना उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात पर्यावरण प्रेमी आणि वनकर्मचारी यांच्यासह अशासकीय संस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.


*उद्देश

निसर्ग आणि वन्य प्राण्यांबद्दल आवड निर्माण करून सद्यस्थितीबाबत माहिती संकलित करणे करीता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी राज्यातील विविध अभयारण्य क्षेत्रात पर्यावरण निसर्ग अनुभव उपक्रम राबवणेबाबत सूचना केल्या होत्या. हा निसर्ग अनुभव उपक्रम कसा राबवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचेना देखील निर्गमित करण्यात आल्या होत्या.


*उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन*

 वरिष्ठ कार्यालयाच्या सुचेनेनुसार माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज परिक्षेत्राच्या वतीने आणि जीआयबी फाउंडेशनने यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणसाठी दिनांक 21मे रोजी नान्नज वन विश्रामगृह येथे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आला आली होती.या प्रसंगी बी एन एच एस चे उप संचालक डॉ. सुरजीत नरवडे यांनी सहभागी कर्मचारी आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तर जीआयबी फाउंडेशनने अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर यांनी या उपक्रमांची आवश्यकता आणि लोकसहभागाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले, तर प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी गुरुदत्त दाभाडे यांनी या उपक्रमाकरीता वनकायदे आणि  सुचनांबाबत मार्गदर्शन केले.


*निसर्ग अनुभवासह वन्य प्राणी गणना*


दि 22 मे दुपारी 3:00 वाजेपासून ते 23 मे रोजी दुपारी 3:00 असा एकुण 24 तासांचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून राबवण्यात आला. 

नान्नज आणि गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील नान्नज, वडाळा, मार्डी, गंगेवाडी हिरज, नरोटेवाडी सह एकुण 24 ठिकाणी पाणवठ्यावरील लपणगृह, माळरानावरील मचाण आणि निरिक्षण गृहातुन ३० वन अधिकारी आणि कर्मचारी, ९ अशासकीय संस्था सदस्य, सातारा, कर्नाटक मधील प्राणी प्रेमी यांनी निसर्ग अनुभव उपक्रमात सहभाग नोंदवत प्राणी गणना नोंदवली.

*सोलापूरच्या गवताळ जंगलाची वन्य प्राणी विविधता.*

माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिसरात माळरान आणि पाणवठ्यावर वनकर्मचारी स्वयंसेवक आणि हालचाल टिपणारे स्वयंचलीत कॅमेर्याद्वारे विविध प्राणी, पक्षीयांची नोंद झाली आहे. यामधे प्रामुख्याने लांडगा, खोकड, काळवीट, निलगाय, आणि अभयारण्याचे आकर्षण असलेल्या माळढोक यांची हलचाल नोंदली गेली.

या उपक्रमांद्वारे घेण्यात आलेल्या नोंदीमधे आढळून आलेल्या वन्य प्राण्यांबद्दल प्राथमीक नोंदी (प्रजाती व संख्या) पुढील प्रमाणे.

1. माळढोक (मादी) -1

2. लांडगा -8

3. खोकड -13

4. मुंगूस -5

5. रानमांजर -6

6. रानटी ससा -18

7. रानडुक्कर -249

8. सायाळ -1

9. कोल्हा -4

10. घोरपड-2

11. मोर -61

12. काळवीट -362

13. नीलगाय -6

[वरील माहिती ही प्राथमीक स्वरांची आहे सविस्तर नोंदीचा अभिप्राय व अहवाल नोंदवलेलेले संपुर्ण पर्पत्र प्राप्त करुन देण्यात येणार असले बाबत अधीकारर्यांनी कळवीले आहे.


*2024 सालीची महाराष्ट्रातील माळढोकच्या अस्तीत्वाची अधिकृत नोंद.*

या निसर्ग अनुभव प्राणी प्रगणने मधे उत्सुकता लागली होती ती माळढोकचे अस्तीत्व शोधण्याची.सबंध महाराष्ट्रातील माळढोक पक्षी अस्तीत्वाची नोंद असलेले सोलापूर आणि विदर्भ ही दोन ठिकाणे मात्र मागील काही वर्षांपासून दोन्ही ठिकाणी एक- एक पक्षी दिल्याच्या नोंदी आहेत.पण सोलापुरातील माळढोकचे अस्तीत्वाची नेहमी शंका उपस्थीत केली जाते.पण यंदाच्या निसर्ग अनुभव प्राणि गणनेला निसर्गाकडून प्रतीसाद लाभला आणि हाडा मांसाच्या जीवंत माळढोकने आपली ऐटदार उपस्थिती लावली आणि आपले अधिकृत अस्तीत्व दाखवले.

 *मार्गदर्शन आणि आयोजन*

या निसर्ग अनुभव उपक्रम प्राणी प्रगणनेसाठी तुषार चव्हाण (उपवनसंरक्षक वन्यजीव, पुणे), स्नेहल पाटील (उपविभागीय वनाधिकारी), किशोरकुमार येळे (सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी जावळे वनपरिक्षेत्र अधिकारी नान्नज, वनपाल जी डी दाभाडे, संतोष मुंढे, वनरक्षक अशोक फडतरे, विवेकानंद विभुते, सुनील थोरात, सत्वशीला कांबळे, ललिता बडे यांनी उपक्रम राबवला उपक्रम यशस्वी करण्यासाठी बी एन एच एस चे उपसंचालक डॉक्टर सुजित नरवडे, जी आय बी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर यांनी कार्यशाळेसह उपक्रमाचे नियोजन केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment