सारा न्यूज नेटवर्क -
विजापूरनाका पोलीस ठाणे डी.बी. पथकाची दमदार कामगिरी मोटारसायकल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या जप्त केल्या ६ मोटार सायकली.
सोलापूर(प्रतिनिधी) :- मागील काही दिवसांपासुन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरुन मा. पोलीस आयुक्त पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) यांनी वेळोवेळी मिंटीग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार विजापुर नाका पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचा अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांचा कसोशीने शोध चालु होता.
विजापुर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास दि. १७/०५/२०२४ गुप्त बातमीदारच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन एक वाहन चोर चोरीची एक काळ्या रंगाची होंडा शाईन घेऊन बराच वेळ टिकेकर वाडी रेल्वे बोगद्या या ठिकाणी थांबलेला होता. सापळा रचुन आरोपी नामे प्रभाकर प्रकाश माने वय १९ वर्षे, रा. कल्याण नगर भाग-३ भिसे फॅशन जवळ, जुळे सोलापूर यास अटक करून आरोपीकडुन सोलापूर शहर हद्दीतील ५ व वॉलचंद नगर पोलीस स्टेशन (इंदापूर जिल्ह पुणे) हद्दीतील १ असे एकुण ६ मोटार सायकल जप्त करून एकुण ३,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ५ गुन्हे उकडकीस आणले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे सहा. पोलीस आयुक्त वि२ अजय परमार वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड पोनि श्रीमती संगिता पाटील (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण - पथक प्रमुख सपोनि/शितलकुमार गायकवाड, ११९२ पोना/गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकों/संतोष माने, समाधान मारकड, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, तपासिक अमंलदार पोहेकॉ/विनय सोनार, पोना/ वामन शेळके यांनी पार पाडली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment