Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, May 9, 2024

जागतिक परिचारिका दिनानिमित्त 50 परिचारीकांचा होणार सन्मान...

 



सारा न्यूज नेटवर्क - 

जागतिक परिचारिका दिनानिमित्त 50 परिचारीकांचा होणार सन्मान...

सोलापूर (प्रतिनिधी ):-  इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिचारिका दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग, खाजगी दवाखाने, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियातील 50 परिचारिकांचा सन्मान सोहळा शनिवार दि. 11 मे 2024 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 या वेळेत डफरीन चौक येथील आय. एम. ए. हॉलमध्ये आयोजित केला आहे. 

सकाळी 9 ते 11 या वेळेत परिचारिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत खुर्ची, लिंबूचमचा, प्रश्नमंजुषा, सापशिडी आशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते 12 या वेळेत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेट वस्तू, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन तर उपस्थित परिचारिकांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. सोलापूर महानगरपालिका प्रजनन व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. वैशाली शिरशेट्टी या प्रमुख अतिथी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर हे असणार आहेत. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. किरण सारडा व फॅमिली प्लॅनिंगचे चेअरपर्सन डॉ. एन. बी. तेली यांनी दिली. 


कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रदीप कोठाडिया, डॉ. निशिकांत मस्के, डॉ. मधुरा बुरटे, डॉ. सुशील मर्दा, डॉ. आयेशा रंगरेज, सपना चिट्टे, डॉ. राजीव प्रधान, डॉ. विजया महाजन, सुगतरत्न गायकवाड यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment