सारा न्यूज नेटवर्क -
बुध्द पोर्णिमा निमित्त विविध ठिकाणी बोधीवृक्ष (पिंपळ) झाडाचे वृक्षारोपण करुन बुध्द पोर्णिमा साजरी.
इको नेचर क्लब व सारा न्यूजचा उपक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे आणि जगाला दया क्षमा शांतीची शिकवण देणारे, विश्ववंदनिय महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या २५६८ वी जयंती सोलापुरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
इको नेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा म्हणून तथागत गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सव या निमित्ताने सोलापुरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
विजापूर रोड वरील द्वारकाधीश मंदिर जलाराम नगर परिसरात पिंपळ बोधीवृक्ष या झाडाचे द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय पाठक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरणाचा संदेश पोहोचण्यासाठी प्रत्येकाला रोप देण्यात आले. याप्रसंगी नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ. मनोज देवकर, प्राध्यापक डॉ.धनराज मोगले, जलाराम सोसायटीचे अध्यक्ष वसंत पवार, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे,रश्मी पावटे व इतर निसर्गप्रेमी उपस्थित होते.
तसेच नालंदा नगर गणेश सोसायटी या परिसरातही गौतम बुद्ध पोर्णिमा निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या ठिकाणी बाल कल्याण समितीचे सदस्य अँड. सुवर्णा कोकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना बाल कल्याण समितीचे अधिकारी दिपक धायगुडे व अँड. सुवर्णा कोकरे यांच्या हस्ते विविध प्रकारच्या रोपे देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाल कल्याण समितीचे अधिकारी दिपक धायगुडे, बाल कल्याण समिती सदस्य अँड. सुवर्णा कोकरे, अश्विनी शिंगे मॅडम, जिजामाता बहुउद्देशीय महिला मंडळ संस्थेचे अध्यक्ष कांबळे, इको नेचर क्लबचे डॉ मनोज देवकर, सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे आदी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सोलापूर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली आहे, इको नेचर क्लबच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment