सारा न्यूज नेटवर्क -
क्राइम न्यूज - महिलेचा विनयभंग करून खंडणी मागणी करणा-या आरोपीस विजापूर नाका पो.स्टे. गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन जेलबंद…
सोलापूर (प्रतिनिधी) :- आरोपी नामे कृष्णकांत अमर रिजोरा राह.४३ अभिषेक नगर, रुबीनगर, बालाजी मंगल कार्यालय, सोलापूर फिर्यादी पिडीत मुलीस डी-मार्ट जवळ असलेले वसुंधरा कॉलेजच्या मागील बाजुस मैदानामध्ये भेटण्यास बोलावुन दोघे एकत्र भेटले असताना काढलेले फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये असून ते मी तुझ्या नातेवाईक व मित्रांना तसेच सोशन मिडीयावर व्हायरल करतो अशी वेळोवेळी धमकी देऊन फिर्यादीकडुन एकुण १२०.७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अस एकुण रु.६,४८,५००/- रक्कम फिर्यादी कडुन घेतले म्हणून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३१/२०२४ भा.दं. वि.कलम ३५४,३८४ प्रमाणे गुन्हा असुन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे कृष्णकांत अमर रिजोरा राह.४३ अभिषेक नगर, रुबीनगर, बालाजी मंगल कार्यालय, सोलापूर यास २४ तासच्या आत अटक करून त्याच्या कडुन गुन्ह्यातील एकुण ०४,३०,०००/- रूपयाचे एकुण ७ तोळे जप्त करून गुन्हा उघडकिस आणला आहे.
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार साो, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) श्री विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त वि२ श्री अजय परमार साो, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दादा गायकवाड साो, पोनि श्रीमती संगिता पाटील साो (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/शितलकुमार गायकवाड, पोहेकाँ सचिन हार, पोना/गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकों/संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, तपासिक अमंलदार पोहेकॉ/विनय सोनार, पोना/ वामन शेळके यांनी पार पाडली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment