Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, May 27, 2024

बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे कविता नगर पोलीस वसाहतीतील गंभीर समस्या बाबत पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन..


 सारा न्यूज नेटवर्क - 

बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे कविता नगर पोलीस वसाहतीतील गंभीर समस्या बाबत पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे( मास्तर) यांच्या मार्गदर्शन खाली संघटनेच्या शहर युवक युनिट च्या माध्यमातून आज दी. 27/05/2024 रोजी मा. पोलिस अधीक्षक सोलापूर (ग्रा) सोलापूर यांना कविता नगर पोलिस वसाहत अंतर्गत सर्व रस्ते अत्यंत बिकट झाल्याने त्यातच अंतर्गत सर्व स्ट्रीट लाईट दैनिय अवस्थेत असल्याने वसहितीमधील रहिवाश्यांना या बिकट, खराब  रस्त्यांमुळे अत्यंत त्रासास सामोरे जावे लागत असून रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने याठिकाणी आंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. दिवस रात्र 24 तास आपले जीव धोक्यात घालून आपल्या प्राणाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावणारे पोलिस अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावून घराकडे रात्री अपरात्री जात असताना या बिकट रस्त्यांमुळे त्यातच बंद लाइट्स मुळे कित्येक वेळा दुचाकी वाहने खड्यात आदळून, घासरून किरकोळ अपघात होत आहे, त्यातच कित्येक पोलिस कर्मचारी हे किरकोळ जखमी देखील झालेले आहेत अशी सद्यस्थिती असून या अती मत्त्वाच्या समस्येकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने अनेक वर्षापासून सदर रस्ते आहे त्याच बिकट परिस्थितीमध्ये आहेत. 


सदरील गंभीर समस्या पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन द्वारे निदर्शनास आणून देत तत्काळ कविता नगर पोलिस वसाहतीमधील रस्ते दुरुस्तीकरण / नूतनीकरण होण्याकामी संबंधित विभागास मंजुरी/ शिफारस होऊन निधी प्राप्त करून द्यावे असे लेखी निवेदन द्वारे विनंती करण्यात आली. यावेळी विनंती प्रमाणे लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले. यावेळी यावेळी शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टूळ, शहर युवक उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील व शहर महिला अध्यक्षा लैला अष्टूळ हे उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment