सारा न्यूज नेटवर्क -
आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते विजापूर रोड कोठणीस नगर येथील शिव गणेश मंदिर परिसरात वृक्षारोपण संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- आज विजापूर रोड वरील डॉ कोटणीस नगर येथे श्री अनिरुद्ध अरुण होमकर सौ श्वेतांबरी अनिरुद्ध होमकर यांच्या २१ शिव-गणेश मंदिर बांधून देण्याच्या संकल्पनेतील चौथ्या शिव-गणेश मंदिराचे प्राण - प्रतिष्ठापना सोहळा पार पडला.
शिव-गणेश मंदिरात श्री मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या निमित्ताने मंदिर परिसरात आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्याची सुरुवात झाली.
शिव गणेश मंदिराच्या श्री मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले की, सोलापुरात उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमान असते व प्रदूषित वातावरणामुळे लोकांना त्रास होतो हा त्रास कमी करण्यासाठी तसेच स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरित सोलापूर करण्याच्या निर्धार व सर्वांच्या प्रयत्नाने सर्व सोलापूर हरितमय करण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील सर्व मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून त्याचे संगोपण करायला पाहिजे.
यावेळी उपस्थित कोटणीस नगर महिला मंडळ जाधव ताई, करंजकर ताई, मनोरमा बँकेचे श्रीकांत मोरे, महावितरण अधिकारी राठोड, युवा नेते महेश देवकर, पत्रकार सुरक्षा समितीचे राम हुंडारे ,पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर, संदीप करंजकर एमबीए विद्यार्थी श्रमदानासाठी येऊन तेथील परिसर स्वच्छता करण्यास व वृक्षारोपणस सहकार्य लाभले. तसेच लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरातील प्रत्येक मोकळ्या परिसरात हरित पट्टा तयार करण्याचा निश्चय केला गेला आहे.आदी उपस्थिती वृक्षारोपण करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment