सारा न्यूज नेटवर्क -
सिव्हिल मधील रुग्णाच्या नातेवाईकांना नास्ता वाटप;
दत्त जयंती निमित्त राष्ट्ररत्न सोशल फौंडेशन चा उपक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि 14/12/2024,दत्त जयंतीचे औचित्य साधून स्व.. श्रीमती भागीरथी बापूराव माळी (अनंतकर)यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री राजू अनंतकर यांनी दिलेल्या देणगीतून सिव्हिल हॉस्पिटल न्यू बी ब्लॉक सोलापूर येथे रुग्णांना शासन तर्फे मोफत जेवण नास्ता असतो, परंतु नातेवाईक यांना नसतो ही गोष्ट लक्षात घेऊन दत्त जयंती चे औचित्य साधून पेशंटच्या नातेवाईकांना सकाळी मोफत गरम उपीटाचा नास्ता वाटप केला.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्षा सौ प्रांजली मोहीकर यांनी केले,देणगीदार श्री राजू अनंतकर यांचा बुके देऊन सन्मान केला. यानंतर सर्व सदस्यांच्या हस्ते रुग्ण नातेवाईक यांना नास्ता वाटप केले.सुमारे 100हुन अधिक गरजूंनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रेमचंद मेने, विश्वस्त ज्योती मेने, चि.वेदांत मोहीकर,तसेच राजेश केकडे सर,राजेश्वर पाटील सर,दीपक करकी,सुहास भोसले,अपर्णा पाठक मॅडम,निकम ताई, चि.नमोश्री निकम ,आणि इतर सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment