सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूरात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा;
इको नेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्कचा उपक्रम..
सोलापूर (प्रतिनिधी) :- इको नेचर क्लबच्या माध्यमातून आज प्रदूषण मुक्त करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस या दिवसाचं निमित्त साधून सैफुल परिसरातील रस्त्यामधील दुभाजकामध्ये मध्ये वातानुकूलित व प्रदूषण मुक्त करणारे रोप तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडणारे असे फुलांचे व कार्बन शोषित करणारे वृक्ष तसेच जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष लावण्याचा एक प्रयत्न करण्यात आला.
आज पासून विविध रोपांचे वृक्षारोपण करण्यास सुरुवात करून महिन्याभरात या दुभाजकांमध्ये शेंकडों रोपे लावण्यात येणार आहेत व त्याचे संगोपण व काळजीही घेतली जाणार आहे. आठवडा पूर्वी या दुभाजकातील सोलापूर महानगरपालिकांच्या स्वच्छता दूत व स्वयंसेवी पर्यावरण मित्र यांच्याकडून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर आज वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे आज इको नेचर क्लबच्या सदस्या तृतीयपंथी राणी वाघमारे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरणाचा संदेश ही देण्यात आला. रस्त्यावरील येणारे जाणारे वाहतूक करणाऱ्या नागरिकांनाही प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी त्यांना प्रबोधनही करण्यात आले.
यावेळी उपस्थितीत पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे, इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर, पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी रविकांत रणदिवे, ब्रह्मा माशाळकर, हैदर कुरेशी, साहिल आडते आधी उपस्थिती होते. त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व राष्ट्रीय नियंत्रण प्रदूषण दिनानिमित्त संदेशही देण्यात आला.
डॉ मनोज देवकर (पर्यावरण दूत) यांचे प्रबोधनात्मक संदेश.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस
प्रत्येक वर्ष २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. हा दिवस भोपाळ गॅस त्रासदीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व
प्रदूषण मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी घातक आहे. प्रदूषणामुळे अनेक आजार निर्माण होतात आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
प्रदूषण नियंत्रणासाठी काही महत्त्वाच्या पावली
वायु प्रदूषण नियंत्रण
जल प्रदूषण नियंत्रण
ध्वनी प्रदूषण नियंत्रण
कचरा प्रबंधन
आपण सर्वांनी प्रदूषण नियंत्रणासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही सोप्या बदल करून प्रदूषण कमी करू शकतो.
आपले योगदान
आपण प्रदूषण नियंत्रणासाठी काय करू शकतो याचा विचार करा आणि आपल्या पर्यावरणासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न करा.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment