सारा न्यूज नेटवर्क-
जुळे सोलापुर गोविंदश्री मंगल कार्यालयात नववर्ष व संक्रांतीनिमित्त शॉपिंग फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन..
सोलापूर(प्रतिनिधी): - कौतुल्य इव्हेंट आयोजित नववर्ष आणि संक्रांतीनिमित्त शॉपिंग फेस्टिव्हल या तीन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सर्व स्टॉलधारकांच्या उपस्थितीत तृप्ती शहा यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी खरेदीसाठी मोठी गर्दी होती. या प्रदर्शनात संक्रांतीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यात असंख्य व्हरायटिज उपलब्ध असल्यामुळे विशेषतः महिला या प्रदर्शनाकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहेत.
हे प्रदर्शन २७, २८ आणि २९ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात संक्रांतीसाठी लागणाऱ्या अनेक लुटायच्या वस्तू, काळ्या रंगाच्या अनेक प्रकारच्या सड्या, भागलपुरी, पैठणी, सॉफ्ट सिल्क साडी, हलव्याचे दागिने, अमेरिकन डायमंडचे दागिने, साउथ इंडियन, पारंपरिक मोत्याचे दागिने, मॉडर्न एथनिक, पार्टीवेअर सूट्स आणि ड्रेसेस, फैंसी पर्सेस, स्वेटर, टी-शर्ट, होम अँक्सेसरीज, पेस्ट कंट्रोल, नेल आर्ट, रांगोळी आयुर्वेदिक ब्यूटी प्रोडक्ट, आयुर्वेदिक होम क्लीनर आणि हर्बल लिपस्टिक यासह खाद्य पदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत. तरी सर्व सोलापूरकरांनी एकदा अवश्य प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन तृप्ती शहा यांनी केले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment