सारा न्यूज नेटवर्क-
सचिन जव्हेरी यांच्या रेल्वे यात्री तिकीट सुविधा केंद्राचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक यांच्या हस्ते उद्घाटन..
सोलापूर(प्रतिनिधी) : - रेल्वे तिकिटाकरिता नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून ज्या त्या प्रमुख चौकांमधील गरजू लोकांना रेल्वेने रेल्वे यात्री तिकीट केंद्राची मंजुरी दिली. त्याचाच एक भाग म्हणून माणिक चौक शुक्रवार पेठ येथील सचिन झवेरी यांच्या यात्री तिकीट सुविधा केंद्राचे उद्घाटन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या हस्ते झाले.
माणिक चौक, मधला मारुती, विजापूर वेस आणि नवी पेठ येथील व्यापारी वर्गांना तसेच सोलापूर शहरातील कोणत्याही गरजू नागरिकांना जवळच असलेल्या शुक्रवार पेठ येथील रेल्वे यात्रा तिकीट सुविधा केंद्राचे उद्घाटन यावेळी संपन्न झाले. व्यापाऱ्यांची सुविधा व्हावी म्हणून हे केंद्र सुरू करण्यात आल्याचे सचिन जव्हेरी यांनी सांगितले.
आरक्षित तिकिटे योग्य आणि लगेचच मिळावे व व्यापारी आणि नागरिकांचा वेळ वाचावा या उद्देशाने केंद्र सुरू केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जव्हेरी परिवाराकडून करण्यात आले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment