सारा न्यूज नेटवर्क -
भीमाकोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य वतीने अभिवादन करण्यात आले.
पुणे( प्रतिनिधी) : - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त बुधवारी (१ जानेवारी) सर्व भिम अनुयायी यांना अभिवादन करण्यास मिळावे याचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.
या दिवशी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यांतून मोठ्या संख्येने भिम अनुयायी अनुयायी येतात.
आज भीमाकोरेगाव येथे 2007 वा शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभाला मानवंदना देण्यात संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी दत्ताभाऊ कदम संस्थापक अध्यक्ष संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन तथा सारा न्यूज नेटवर्कचे पुणे जिल्हा प्रतिनिधी, करूना ताई कदम तसेच संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे पुणे जिल्हा निरीक्षक सुनील जी माने तसेच त्यांच्या पत्नी राणीताई माने या उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment