Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, December 11, 2024

सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...!



सारा न्यूज नेटवर्क - 

 सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...!

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरात 10 डिसेंबर रोजी  मानवाधिकार दिनानिमित्त समाज कल्याण हॉल रंगभवन येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला.

 यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते विष्णू करामपुरी महाराज होते.

 कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून एस.आर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिल भाई रामपुरे,पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष  यशवंत पवार, वाहतूक संघटना संयुक्त महासंघचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद, अखिल भारतीय जनजागृती संघटनांचे प्रदेश अध्यक्ष इब्राहिम जमादार, ज्येष्ठ पत्रकार अन्सार तांबोळी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात अकबर शेख यांना आदर्श रुग्णसेवक, जुबेर भाई बागवान आदर्श समाजसेवक, नवाज कदिर रमजान आदर्श समाजसेवक, युसूफ अहमद जमादार आदर्श रुग्णसेवक, मीर महमूद खान आदर्श ज्येष्ठ नागरिक, हलीमा मिर खान आदर्श महिला, शाकीर अलाउद्दीन तांबोळी आदर्श उद्योजक, जहीर अब्दुल रशीद शेख आदर्श अभियंता, रमजान महमूद तुटके आदर्श समाजसेवक, रफिक युसुफ शेख आदर्श समाजसेवक, फयाज अब्दुल गणी मुल्ला आदर्श उद्योजक, परवेज अब्दुल गणी मुल्ला आदर्श समाजसेवक, जिलानी वाहिद बेग आदर्श समाजसेवक, अजहर अब्दुल रौफ बिजापुरे आदर्श अभियंता, सलीम चांद साहब मुजावर आदर्श उद्योजक,प्रवीण चांदेकर आदर्श समाजसेवक राम हुंडारे, आदर्श पत्रकार, इरफान जहांगीर मुजावर  आदर्श उद्योजक म्हणून या सर्वांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला.


 या कार्यक्रमाच्या अखेर मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सादिक शेख यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.

 या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महबूब कादरी, प्रवीण चांदेकर, परवेज मुल्ला, अकबर शेख, मीर महंमद खान, मुर्तुज शेख, मोहसीन बागवान व मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केला.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment