सारा न्यूज नेटवर्क -
महापरिनिर्वाण दिनाची तयारी केली नाही;
अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी नेमली चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती..
सोलापूर(प्रतिनिधी) : - वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादनाचा तयारी केली नसल्याबद्दल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली असून, या समितीचा अहवाल बुधवारी येण्याची शक्यता आहे.
महापरिनिर्वाणदिनी अभिवादनाची तयारी केली नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी संतप्त झाले होते. यासंदर्भात त्यांनी सोमवारी अधिष्ठातांना निवेदनही दिले होते. त्यानुसार प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. कर्मचाऱ्यांनी अभिवादनाची तयारी का केली नाही, याबाबत प्रशासकीय अधिकारी शैलेंद्र सिंह जाधव यांच्याकडे विचारणा केली; पण त्यांनी बाहेर असल्याचे सांगितले. शिवाय वरिष्ठ सहायक हरिप्रसाद राऊळ हेही तेथे उपस्थित नव्हते. त्यांनीही उडवा उडवीची उत्तरे दिल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
काळ्या फिती लावून आज आंदोलन केल्यानंतर कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले संबंधितावर निलंबन करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदन अधिष्ठातांना देण्यात आले यावेळी कास्टट्राइब अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन सोनवणे, डॉ. औदुंबर मस्के, डॉ. मनीषा शिंदे, विश्वनाथ भोसले, नितीन कसबे आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment