Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, December 17, 2024

परभणी येथील संविधान प्रतिकृतीची मोडतोड करणार्‍या विकृत व्यक्तींवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करा;

 


सारा न्यूज नेटवर्क - 

परभणी येथील संविधान प्रतिकृतीची मोडतोड करणार्‍या विकृत व्यक्तींवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करा;        

संत रोहिदास चर्मकार समाज सेवा संघाची निवेदनाद्वारे मागणी..    

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- परभणी येथे गेल्या आठवड्यात एका विकृत व्यक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची मोडतोड केली.याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करत सदर मनुवादी विकृत व्यक्तीवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय तेली यांना देण्यात आले.यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ युवराज मोरे यांनी निषेध व्यक्त करताना संविधान प्रतिकृतीची मोडतोड ही फक्त एका मनोविकृती असलेल्या व्यक्तीचे काम नसून यामागे जातीयवादी शक्तींचा मोठा हात असून याची चौकशी करून संबंधित घटकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. महिला राज्याध्यक्ष सौ शोभाताई शिंदे यांनी संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड म्हणजे लोकशाही धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. 


तर महिला कार्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे म्हणाल्या संविधानाने महिलांना ग्रामपंचायतीच्या सरपंच ते देशाच्या राष्ट्रपती पदावर बसण्याचा बहुमान दिला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या एक पाऊल पुढे कार्यरत आहेत यामुळेच मनुवादी शक्तींची विचारधारा संविधान बदलण्याची आहे याचेच हे एक उदाहरण आहे. यावेळी संत रोहिदास चर्मकार समाज सेवा संघाचे सल्लागार श्री शिरीष शिंदे, जिल्हाध्यक्ष सागर शिंदे व पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शरद नारकर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment