सारा न्यूज नेटवर्क -
रेशन कार्ड धारकांना राहत्या ठिकाणी शिधापत्रिका धान्य दुकानात ट्रान्सफर करुन देण्यात यावी-डॉ युवराज मोरे
कोल्हापूर(प्रतिनिधी) :- इचलकरंजी शहर हे कापड उद्योगातील अग्रेसर शहर म्हणून जागतिक स्तरावर त्याची ओळख आहे म्हणूनच इचलकरंजीला मँचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते.इथे अनेक गरजू कामगार बाहेरुन कामगार म्हणून अनेक कंपनीकडे कामाला लागले आहेत.अनेक वेळा त्यांची कामाची ठिकाणे बदलली जातात. 2 ते 3 किमी अंतरावर त्यांना धान्य आणण्यासाठी जावे लागते पण वेळे अभावी अनेकदा धान्य मिळत नाही.कामाच्या ठिकाणी शिफ्ट सुरू झाली की वेळ मिळत नाही यामुळे मिळणारे महिन्याचे धान्य मिळत नाही.हे निव्वळ गैरसोयीमुळे होते. याकरिता रेशन कार्ड धारकांना ते ज्या ठिकाणी वास्तव्य करतात तेथील धान्य दुकानात त्यांच्या शिधापत्रिका नोंद करण्यात याव्या अशी मागणी संत रोहिदास चर्मकार समाज सेवा संघाच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे करण्यात येतअसल्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ युवराज मोरे यांनी सांगितले.रेशनकार्ड हे अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश असून कार्ड धारकांना प्रत्येक महिन्याला शासनाच्या नियमाप्रमाणे कार्ड धारकांना धान्य मिळते.परंतू ज्या रास्त भाव दुकानाला अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत कार्ड जोडलेले आहे ते कामानिमित्त, रोजगाराच्या निमित्ताने इतरत्र राहत असल्याने कार्ड धारकांच्या वेळेवर धान्य मिळत नाही.कार्ड धारकांचे रहाते घरापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळेत धान्य उचल करता येत नाही. तरी रेशनकार्ड रहात असलेल्या परिसरातील रास्त भाव दुकानात ट्रान्सफर करुन दिलेनंतर कार्ड धारकांना पूर्ववत धान्य मिळणेची हमी व खात्री मिळावी अशी विनंती डॉ रजनीताई शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली. तरी इच्छुक कार्ड धारकांना रेशनकार्ड ट्रान्सफर करुन आपले कार्यालयाकडून मिळावे. तरी कार्ड धारकांचे मागणीप्रमाणे सदर दुकानास रेशनकार्ड ट्रान्सफर करुन मिळावे यासाठी शहर,तालुका पुरवठा कार्यालयाना तात्काळ आदेश द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांना निवेदन देताना संत रोहिदास चर्मकार सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ युवराज मोरे, महिला राज्याध्यक्ष सौ शोभाताई शिंदे, महिला राज्यकार्याध्यक्ष सौ डॉ रजनीताई शिंदे, सल्लागार शिरीष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शरद नारकर व जिल्हाध्यक्ष सागर शिंदे उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment