Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, December 11, 2024

जिल्हा सरकारी वकील अँड. प्रदीपसिंह राजपूत लिखित "राजपूत पॉकेट बुक” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न..



सारा न्यूज नेटवर्क 

जिल्हा सरकारी वकील अँड. प्रदीपसिंह राजपूत लिखित "राजपूत पॉकेट बुक” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- जिल्हा सरकारी वकील प्रा. अँड. प्रदीपसिंह राजपूत यांनी लिहिलेल्या "राजपूत पॉकेट बुक" (BNS, BNSS आणि BSA) या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.अमित आळंगे व इतर पदाधिकारी आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य अँड. मिलिंद थोबडे यांच्या शुभहस्ते सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले.


सुरुवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.अमित आळंगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतात राजपूत सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक वकिलांनाच नाही तर पोलिसांना देखील अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधीज्ञ अँड.मिलिंद थोबडे, अँड.श्रीनिवास क्यातम, अँड.एस.एस.सदाफुले, अँड.गंगाधर रामपुरे, त्यांचे मनोगत व्यक्त करून प्रत्येक वकिलास हे पॉकेट बुक त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त होईल आणि राजपूत सरांनी हे पुस्तक मोफत दिल्यामुळे त्यांचे आभार देखील मानले. पुस्तकाचे लेखक अँड.प्रदीपसिंह राजपूत यांनी त्यांच्या या पुस्तकाची संकल्पना आणि हे पुस्तक लिहिण्याचा संपूर्ण प्रवास वर्णन केला. तसेच त्यांनी 100 जन्मठेप आणि दोन फाशी शिक्षा मिळवल्याबद्दल शंभर उपक्रम राबवण्याचा संकल्प करून त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम असल्याचे सांगितले.


सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो अध्यक्ष अँड.अमित व्हि.आळंगे, उपाध्यक्ष अँड.व्ही. पी. शिंदे, सचिव अँड.मनोज नागेश पामूल, सहसचिव अँड.निदा सैफन, खजिनदार अँड. विनयकुमार कटारे सह सोलापूर बार असोसिएशन बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अँड मनोज पामुल व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अँड.निदा सैफन यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment