Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, December 11, 2024

मानवाधिकार संरक्षण संघटनेचा आदर्श पत्रकार म्हणून राम हुंडारे यांना पुरस्कार प्रधान...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मानवाधिकार संरक्षण संघटनेचा आदर्श पत्रकार म्हणून राम हुंडारे यांना पुरस्कार प्रधान...

  सोलापूर (प्रतिनिधी ):-  सोलापुरात मानवअधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मानवाधिकार दिन समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मानवाधिकार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  विष्णू कारमपुरी (महाराज)होते.

कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष सादिक शेख सह प्रमुख मान्यवर म्हणून एस.आर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिल भाई रामपुरे,पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, वाहतूक संघटना संयुक्त महासंघचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद, अखिल भारतीय जनजागृती संघटनांचे प्रदेश अध्यक्ष इब्राहिम जमादार, ज्येष्ठ पत्रकार अन्सार तांबोळी (बी एस) उपस्थित होते. 


यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांना शाल पुष्पगुछ व सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते सत्कार सत्कार करण्यात आला.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment