सारा न्यूज नेटवर्क -
मानव अधिकार संरक्षण संघटनेचे सोलापुरात महत्त्वाची बैठक, विविध विषयावर चर्चा
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर व जिल्ह्यात व त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गरीब, पिढीत, वंचित नागरिकांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता निवेदन,उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे जनसामान्य नागरिकांच्या मानवहितांसाठी संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी यश देखील मिळाला आहे.
सोलापुरात मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या विविध विषयावर महत्त्वाची बैठक ठेवण्यात आले होते त्या बैठकीमध्ये शहरातील व जिल्ह्यातील जनसामान्य नागरिकांच्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली या बैठकीत मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, प्रदेश कार्याध्यक्ष भैय्यासाहेब शिंदे, प्रदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी,जिल्हा अध्यक्ष चांद साहब मुजावर, जिल्हा अध्यक्ष (आरोग्य विभाग ) अकबर शेख, शहर संपर्क प्रमुख फयाज मुल्ला, शहर प्रतिनिधी मीर महमूद खान, शहर प्रतिनिधी जाहीर शेख, पत्रकार नागनाथ गणपा, शहर प्रतिनिधी मुदस्सर ओरसन,शहर प्रतिनिधी जिलानी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment