Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, December 6, 2024

विजेच्या खांबावर चढता,वायरी ओढता.. ड्युटी निभावताना सतर्क राहणे सोडता.. शिबिरात अधिकार्‍यांनी कर्मचाऱ्यांना केले जागे..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

विजेच्या खांबावर चढता,वायरी ओढता.. 

ड्युटी निभावताना सतर्क राहणे सोडता.. 

शिबिरात अधिकार्‍यांनी कर्मचाऱ्यांना केले जागे.. 

सोलापूर(प्रतिनिधी) :- खांबावर चढून विजेची काम करता, तारा ओढता.. हे करीत असताना थोडे भान ठेवून आपल्या जीवचा विचारही केला पाहिजे. आपल्या कुटुंबासाठी सतर्क रहा, असा सल्ला महावितरणमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आला.

दैनंदिन धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्याकरिता संतुलित आहार, व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच आपले जीवन समृद्ध करेल असा विश्वास प्रशिक्षक प्रशांत लहाने, चिदानंद फाळके यांनी व्यक्त केला. महावितरणच्या सोलापूर मंडलात सेवेप्रति सतर्कतेसह शारीरिक सजगता शिबिर पार पडले. लघु प्रशिक्षण केंद्र, सोलापूर व प्रशिक्षण व सुरक्षा विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले. यावेळी कार्यकारी अभियंता आशिष मेहता, रमेश राठोड, सुरेश कुऱ्हाडे, उपकार्यकारी अभियंता राजेश मदने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी व कर्मचारी यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रशिक्षकांनी समर्पक उत्तरे देत समाधान केले. शिबीर घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment