आष्टा हायस्कूल आष्टा कासार येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न..
लोहार (प्रतिनिधी - विजयकुमार लोंढे :
24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. 27 वर्षानंतर असंख्य मित्र मैत्रीण शिक्षकांसह एकमेकांना भेटले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आष्टा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ओमप्रकाश चौधरी यांनी स्वीकारले. प्रमुख अतिथी शरणाप्पा फुंडीपल्ले गुरूजी, लहू गायकवाड गुरूजी, अंबादास चौधरी गुरुजी, जयप्रकाश चौधरी गुरुजी, सुरेश सोमवंशी मामा, रमेश कोळेकर मामा, मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत, प्रदीप फुंडीपल्ले, दत्तात्रय बलसूरे, संजय शिदोरे, मुकेश सोमवंशी, अलका काळे, रुपाली चव्हाण, विकास बचाटे, विनायक खरात उपस्थित होते.
प्रारंभी सरस्वती पूजन करून राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशालेतील दिवंगत माजी शिक्षक व जे विद्यार्थी स्वर्गवासीय झाले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
*"एक अतूट बंधन टॅक लाईन"* असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन मुकेश सोमवंशी यांनी सांगितले..शिक्षकांचा सत्कार समारंभ आणि सूत्रसंचालन धनराज आळंगे यांनी केले. एका गुरुजनांचा सत्कार प्रत्येकी चार विद्यार्थ्यांनी मिळून केले. शाल, पेन, गुलाबाचे फूल पुस्तक देण्यात आले.
विध्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त करताना MPSC मार्फत मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत असलेले गुळे बालाजी यांनी आपल्या शालेय जीवनातील आणि आयुष्यातील संघर्षमय अनुभव व अनेक अडचणीवरती कसे मात करून यशस्वी झाल्याची माहिती सांगितली. मैत्री वर आधारित गीत आणि कविता गाऊन कार्यक्रमाची विलक्षण रंगत वाढवली. विश्वंभर शिंदे, कविता राठोड, छाया स्वामी, सविता मोटे, सुनीता सुलतानपुरे यांनी गीत गायन केले .
शिक्षकांच्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये डॉ ए. पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा अभ्यास करून जीवन जगावे त्यांनी केलेलं त्याग देशप्रेम न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या जीवनचरित्राची माहिती प्रदीप फुंडीपल्ले यांनी केले. मुख्याध्यापक सावंत यांनी विद्यार्थ्यांना शाळेबाबतची गोडी निर्माण व्हावी व शाळेसाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे याबाबत आवाहन केले. अध्यक्षीय समारोप शरणप्पा फुंडीपल्ले यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीत नेले आणि सध्याच्या पिढीने आपल्या आई वडिलांची काळजी घ्यावी असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार सदाशिव सोमवंशी यांनी केले. स्वाधिष्ठ भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यातील सुख दुःखाची मांडणी करता यावी म्हणून पुन्हा एकदा 10 वी वर्गात बसून सर्वांनी आपापली ओळख, आपण सध्या काय करतो याबाबत माहिती दिली. सर्वांनी एकत्रित वंदे मातरम् गीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment