सारा न्यूज नेटवर्क -
राऊंड टेबल इंडिया तर्फे बाल दिनानिमित्त, स्वामी विवेकानंद प्रशालेत चित्रकला स्पर्धा संपन्न..
सोलापूर ()प्रतिनिधी) : - आज दि.14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त स्वामी विवेकानंद शिशु, प्राथमिक शाळा व स्वामी विवेकानंद प्रशाला येथे *बाल दिनानिमित्त* सकाळी 11 वाजता *सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल इंडिया (309)* या संस्थेतर्फे *चित्रकला स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले...
ही स्पर्धा दोन गटात संपन्न झाली...
*इयत्ता 3री ते 5वी या गटासाठी रंगभरण स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले तर *इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी वैकल्पिक विषयांवर चित्रकला स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले होते...
या स्पर्धेसाठी राऊंड टेबल ट्रस्टतर्फे चित्रकला साहित्याचे वितरण विनामूल्य करण्यात आले...
प्रारंभी देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन राऊंड टेबल ट्रस्टचे पदाधिकारी व स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक *डॉ.हणमंत नारायणकर,* स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका *मा.सौ.सविता व्हनमाने* यांच्या शुभहस्ते करण्यात आले...
यावेळी राऊंड टेबलचे राष्ट्रीय कन्वेनर *मा.तरंग शहा* व या स्पर्धेचे समन्वयक *मा.नितेश संकलेचा* यांनी मनोगत व्यक्त केले...
याप्रसंगी राऊंड टेबल चे उपाध्यक्ष *मा.अभिजीत मालाणी,* खजिनदार *मा.पंकज सचदेव,* सेक्रेटरी *मा.अभिषेक जवर,* सदस्या *मा.नयना सचदेव* व प्रशालेतील शिक्षक वृंद उपस्थित होते...
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडाशिक्षक *मा.सुभाष माने* यांनी केले...
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment