सारा न्यूज नेटवर्क -
सोरेगाव तालमीचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा भाजपा शहर सचिव तथा माजी सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाश राठोड यांच्या उपस्थितीत पार पडणार...
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोरेगावच्या आखाड्यातील अनेक पैलवानांना घडवणारी सोरेगावची तालीम मागील कित्येक वर्षापासून बंद पडलेली होती. जीर्ण झालेली भिंत, तुटके फाटके पत्रे, कोणत्याही रंग रंगोटी बिना भकास झालेल्या तालमीला माजी सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाश राठोड यांनी मूर्त स्वरूप देऊन पैलवानांच्या स्वप्नांना बळ दिला आहे. जीर्ण झालेल्या तालमीच्या संदर्भात सोरेगाव येथील शिष्टमंडळाने प्रकाशभाऊ राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन तालिम नूतनीकरण करण्याची विनंती केली. नेहमीच जनतेसाठी तत्पर राहणारे प्रकाशभाऊ राठोड यांनी तालमीचे नूतनीकरण करून लगेच लोकार्पण करू आणि तेथील पैलवानांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कशाप्रकारे पाठवता येईल एकंदरीत सोरेगाव आणि सोलापूरचा नाव कुस्ती क्षेत्रामध्ये कशाप्रकारे मोठा आणि उज्ज्वल होईल यावर विशेष कामगिरी करूया, असे बोलून जीर्ण झालेल्या तालमीचे तात्काळ नूतनीकरणाला सुरुवात झाली आणि काम अंतिम टप्प्यात आहे.
येत्या रविवार दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता माजी सहाय्यक आयुक्त प्रकाशभाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालमीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी सर्व सोरेगाव ग्रामस्थ चंदू खडाकडे, राजशेखर पाटील, सिद्धाराम भीमदे, राजू खडाखडे, शिवानंद कोरे, रायसिद्ध कोळी, संतोष मेत्रेकर यांच्यासह इतर सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मंडळी देखील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्या करिता उपस्थित राहून पैलवानांना पुढच्या कामगिरीसाठी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment