सारा न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन..
----------------------------------------
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि.१७.११.२०२५*
हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने दक्षिण सोलापूर कुंभारी येथील, मॉसाहेब विडी कामगार वसाहतीतील सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. मीनाताई ठाकरे यांच्या मूर्तीचे विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करून करण्यात आले.
सदर प्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर, रेखा आडकी, प्रशांत जक्का, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, अरुण सिडगीद्दी, स्वाती शिंदे, रेणुका मच्चा, भाग्यलक्ष्मी त्रिमल, ज्योती चिलबेरी, सुनीता चिलबेरी, उमा कोंडा, सुनंदा लोडल, नरसम्मा बल्ला, अंबिका तिरंदास, अंबुबाई कडवेल, नागमणी अज्जा, यांच्यासह बिडी कामगार माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment