Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, November 8, 2025

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 आंतरजिल्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन सोलापूर शहरासह अन्य शहर जिल्ह्यामधील एकुण ३५ मोटारसायकली जप्त;

जेलरोड पोलीसांची दमदार कामगिरी..


सोलापूर (प्रतिनिधी):- आंतरजिल्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन सोलापुर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, सांगली शहर, मुबंई शहर, ठाणे शहर मधील एकुण ३५ मोटारसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हे उघडकीस आणले आहे.सोलापूर शहरामध्ये मोटारसायकल चोरीबाबत मागील काही माहिन्यापासुन पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होत असल्याने मा. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.दिनांक ३१/१०/२०२५ रोजी जेलरोड पोलीस ठाणेकडील पोकों युवराज गायकवाड, पोकों- उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळालेवरुन व सीसीटिव्हीची पडताळणी केली असता एक इसम चोरी मोटारसायकली विक्री करण्यास हेवन टॉवर शनिवार पेठ सोलापुर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेयरुन जेलरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि संदीप पाटील व पथकातील अंमलदार हे त्याठिकाणी जावुन सापळा लावला असता त्याठिकाणी एक इसम मिळून आला सदर इसमाचे ताब्यात जेलरोड पोस्टे गुरनं ४७८/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल क्रमाक एम एच १३ डी एल ५८५६ ही मिळुन आल्याने सदरची मोटारसायकल जप्ती पंचनाम्याने जप्त केली आहे. आरोपी नामे शंकर भरत देवकुळे रा गुपो वैराग रोड तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव याचे यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचेकडे सदर बझार पोलीस ठाणेकडील एकुण ६ मोटारसायकली व फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील एकुण ३ मोटारसायकली तसेच जेलरोड पोलीस ठाणेकडील २ अशा एकूण ११ मोटारसायकली तसेच पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, ठाणे शहर, मुंबई शहर, सांगली शहर या शहरातील एकुण २४ मोटारसायकली असे एकुण ३५ मोटारसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त आले आहे.या कारवाईत एकुण १०,९८,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.


सदर कामगिरी एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापुर, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ विजय कबाडे,सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१  प्रताप पोमण सोलापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  शिवाजी राऊत,पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक  संदीप पाटील, सफौ-एम. डी. नदाफ, सफौ-शरीफ शेख, सफौ-गजानन कणगिरी, पोहेकों-धनाजी बाबर, पोहेकों-अब्दुल वहाब शेख, पोहेकों वसंत माने, पोना-भारत गायकवाड, पोकों-उमेश सावंत, युवराज गायकवाड, संतोष वायदंडे इकरार जमादार, कल्लप्पा देकाणे, राजपाल फुटाणे, विठठल जाधव, साईनाथ यसलवाड, सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकों प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, परिमंडळ कार्यालयकडील पोना-अयाज बागलकोटे, पोकॉंअर्जुन गायकवाड यांनी केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment