Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, November 22, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा छत्रपती ब्रिगेडच्या वतीने  निषेध.


सोलापूर (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी मालेगाव येथील चार वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती ब्रिगेडच्या वतीने शिव प्रताप चौक (आसरा चौक) येथे तीव्र निदर्शने करून चिमुरडीला श्रद्धांजली वाहण्यात आली.

चिमुरडीच्या प्रतिमेस ओवी डिंगणे या बालिकेचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला फाशी द्या बाळाला न्याय द्या या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. 



पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे त्यामुळे लेकीबाली असुरक्षित असून आता आपली रक्षा स्वतःच केली पाहिजे महाराष्ट्र राज्यात महिला अत्याचारांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री यांच्या नातेवाईकाबाबत असा जर प्रकार घडला असता तर संपूर्ण मंत्रिमंडळ पेटून उठले असते त्यामुळे महिला अत्याचाराचा प्रकरणी नवीन न्यायालयाची निर्मिती करून एका महिन्याच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा तामिळनाडू सारखे तात्काळ इनकाऊंटर करून जलद न्याय द्यावा अशी मागणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलीयावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम  जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके नागेश शिंदे जिल्हा सचिव सिताराम बाबर जिल्हा संघटक सुलेमान पिरजादे जिल्हा कार्याध्यक्ष बबन डिंगने शहर कार्याध्यक्ष रमेश भंडारे शहर संघटक सिद्धाराम कोरे आकाश बनणे मुदतसर शेख राहुल कारंडे अरुण जगदाळे वैभव जावळे विकास बचुटे वैभव जावळे बाळू सूर्यवंशी ज्ञानेश्वर पवार प्रवीण स्वामी संपत निंबाळकर सुमित तेली प्रकाश जाधव रफिक शेख गौरीशंकर हवीनावे केदार ख्याड मल्लिकार्जुन भंडारे अजीम मकानदार संकेत कुलकर्णी बसू तज्ञकेरी ज्ञानेश्वर पवार तेजस गायकवाड राजकुमार शिंदे प्रशांत पवार राम चव्हाण आदी उपस्थित होते


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment