सारा न्यूज नेटवर्क -
उल्हासनगर मध्ये 'भाजप'ला खिंडार, भाजप चे मुख्य स्तंभ चार नगरसेवक TOK मध्ये सामील, आता ओमी पप्पू कलानी पॅटर्न सुरु..
उल्हासनगर: (प्रतिनिधी) :- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी दिसून येत आहेत, सर्वत्र भाजपमध्ये इनकमिंग सुरू असून सुद्धा उल्हासनगर मधील भाजपचे चार दिग्गज माजी नगरसेवक टीम शिवसेना ओमी कलानी युतीमध्ये मध्ये सामील झाले आहेत.
उल्हासनगर मधील भाजपचे मुख्य स्तंभ असलेले माजी नगरसेवक जमनु पुरसवाणी, महेश सुखरामानी, प्रकाश माखिजा, राम (चार्ली )पारवानी यांनी शिवसेना टीओके युतीमध्ये प्रवेश केला यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गोपाळराव लांडगे,ओमी कलानी,पंचम कलानी त्यासोबतच आदी मान्यवर उपस्थित होते
या राजकीय घडामोडी ची शहरात सर्वत्र चर्चा सुरू असून
आता ओम कलानी पॅटर्न सुरू असे नागरिकांमध्ये सर्वत्र म्हटले जाते
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment