सारा न्यूज नेटवर्क -
सेवानिवृत्त निमित्त विजय मुरलीधर पवार यांचा संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान तर्फे समाजसेवा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
उल्हासनगर (प्रतिनिधी) :- विजय पवार साहेब (रेल्वे वरिष्ठ मोटरमॅन) हे ४० वर्षांच्या दीर्घ आणि समर्पित सेवेनंतर ३० नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त होत आहेत.
आपल्या या संपूर्ण आयुष्यात त्यांनी भारतीय रेल्वेसाठी निष्ठा आणि प्रामाणिकपणे अखंड योगदान दिले असून सामाजिक जबाबदाऱ्या देखील पूर्ण जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने पार पाडल्या आहेत. आपल्या या सेवानिवृत्ती समारंभालाही त्यांनी समाजाला समर्पित केले आहे.
या निमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन लिंबोरे प्रदेश अध्यक्ष श्री पितांबर शिंदे यांच्या हस्ते विजय पवार साहेब यांना समाजसेवा पुरस्कार देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखमय, आनंददायी जावो अशा शुभेच्छा देऊन, सोबतच त्यांनी आपल्या सेवानिवृत्त नंतरचा वेळ सामाजिक सेवेला द्यावे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष श्री गजानन लिंबोरे यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment