सारा न्यूज नेटवर्क -
सराईत गुन्हेगारांना शोधून फौंजदार पोलीस ठाण्यात चौकशी हद्दीतील चोरी, घरफोडी रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत एक्शन मोडवर
सोलापूर (प्रतिनिधी ) :- आगामी महापालिका निवडणूक आणि सध्या शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर फौंजदार चावडी पोलीस ठाणे एक्शन मोडवर आले आहेत. शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना शोधून ठाण्यात आणले जात आहे. त्यांची संपूर्ण माहिती (२४ तासांतील प्रत्येक कृती) तथा डोजिआर फॉर्म पोलिस घेत आहेत. त्या प्रत्येकाच्या हालचालींवर आता पोलिसांची नजर राहणार आहे.
फौजदार चावडी पोलिसांनी माऊली मुद्दे, ग्रंथराज महिंद्रकर, कुणाल कांबळे,केशव फडतरे, गणेश बोधवाले, राहुल जाधव, श्रीकांत वाघमारे, कल्याण घुगे, बादल बनसोडे, अभिषेक लोंढे, नवनाथ शिंदे, श्रीकांत भिंगे, शिवम अलकुंटे, गणेश चव्हाण, शमिम शेख, अभिजित जाधव, अजय मुद्दे, प्रसाद भागवत, विकास गावडे, रोहित गवळी या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना शोधून फौंजदार चावडी पोलिस ठाण्यात आणले होते. त्या सर्वांची अपडेट माहिती पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. दरम्यान, अशाच पद्धतीने सलगर वस्ती, विजापूर नाका, एमआयडीसी, जोडभावी पेठ, जेलरोड, सदर बझार या सहा पोलिस
ठाण्याकडून कार्यवाही केली जात आहे पोलिस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉ अश्विनी पाटील, गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही फौंजदार चावडी पोलीस ठाण्याकडून करण्यात येत असून फौंजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे हद्दीतील चोरी घरफोडी रोखण्यासाठी एक्शन मोडवर आल्याचे दिसतं आहे
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment