Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, November 9, 2025

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क - 

सोनपापडीत निघाली आळी!

देवासीज अन्नपूर्णा मिठाई आणि नामकीन भांडार येथे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीबाबत तक्रार.. 


सोलापूर (प्रतिनिधी) : - सागर भारती यांनी देवासीज अन्नपूर्णा मिठाई आणि नामकीन भांडार येथे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार केली आहे.

सागर म्हणतात, ‘मी सोलापूर येथे राहणारा एक जागरूक ग्राहक आहे. दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता, माझ्या बहिणीने देवासीज अन्नपूर्णा मिठाई आणि नामकीन भांडार (दावत चौक, जुळे सोलापूर) या दुकानातून पेढे व सोनपापडी विकत घेतली होती.


घरी आल्यानंतर जेव्हा आम्ही सोनपापडी उघडून खाल्ली, तेव्हा त्या पॅक केलेल्या सोनपापडीपैकी एका तुकड्यात जिवंत आळी (किडा) आढळून आली. ही बाब अत्यंत धोकादायक असून अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. विशेष म्हणजे माझी पत्नी सध्या गर्भवती आहे आणि आम्ही दोघांनीही ती सोनपापडी आधीच खाल्ली होती.

या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मी संबंधित दुकानात व आपल्या कार्यालयात आलो असता, तेथे या प्रकरणाकडे काहीसे दुर्लक्ष केले गेले आणि मला “व्यापाऱ्याशी आम्ही बोलू" असे सांगण्यात आले.

अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे अन्न विक्री करणे हे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम (FSSAI) 2006 अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे कृपया या प्रकरणाची तपासणी करून संबंधित दुकानदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मी नम्र विनंती करीत आहे.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment