सारा न्यूज नेटवर्क -
प्रभाग क्रमांक २४ मध्ये स्थानिक नागरिकांचा स्नेहमेळावा..!
सोलापूर(प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २४ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळावा कार्यक्रमास मा आमदार सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला तसेच सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या स्नेहमेळाव्याद्वारे प्रभागातील विविध स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षांबाबत सविस्तर चर्चा केली. समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून विकासाची गती अधिक वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यासोबतच, नागरिकांनी दिलेल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आगामी काळात प्रभागातील विकासकामे अधिक वेगाने राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला मंडल अध्यक्ष श्री.महेश देवकर,श्री. शिवराज सरतापे,श्री विश्वरूपे,श्री डॉ मलाडे श्री.विशाल गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला मंडळ सदस्य आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment