सारा न्यूज नेटवर्क -
नंदनवन ज्येष्ठ नागरिक सामाजिक संघटनेला मिळालं ISO मानांकन.
माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे उद्घाटन संपन्न...
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर येथील विजापूर रोड जुळे सोलापूर भागातील ज्येष्ठ नागरिकांची सुप्रसिद्ध असलेली नंदनवन जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल प्रमाणपत्राच्या उद्घाटनाचे कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहर सचिव तथा माजी सहाय्यक आयुक्त श्री प्रकाशभाऊ राठोड उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि उत्तम सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक कोरे सर यांनी केले. मोहन अणवेकर सरांनी संस्थेनी आजवरच्या केलेल्या कार्याची सविस्तर माहिती देत आयएसओ मानांकन कशाप्रकारे मिळालं हे देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कौतुक करत नंदनवन सामाजिक संस्थेला आयएएस व मानांकन मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पुढे प्रकाश राठोड यांनी बोलताना म्हणाले आय एस ओ मानांकन फटकावणारी सोलापुरातील ही पहिली संस्था असेल की ज्याचं कार्य कर्तृत्व चांगलं असतं त्यांना नेहमीच पुरस्कार मिळत असतात. नंदनवन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्य खूप मोलाचे आहेत उतरत्या वयात असताना देखील आपण समाजासाठी बहुमोलाचे कार्य करत आहात असे म्हणत ज्येष्ठ नागरिकांचे कौतुक त्यांनी केले तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण असल्यास किंवा काही मदत हवी असल्यास निश्चित माझ्या कार्यालयाला भेट द्या. मला मदतीची हाक द्या मी तुमच्यासाठी सदैव तत्पर राहीन. असे प्रकाश राठोड यांनी म्हणाले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी सभासदांचे अभिनंदन करत मनोगत व्यक्त केले जेष्ठ नागरिक श्रीशैल कोरे यांनी आभार व्यक्त केले.यावेळी द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक श्री.दत्तात्रय पाठक यांच्यासह नंदनवन ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मिथुन राठोड सामाजिक कार्यकर्ते तसेच आकाश चव्हाण विनोद राठोड संतोष जाधव इतर मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment