Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, November 27, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

जनविकास क्रांति सेनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त सामुदायिक संविधानाचे वाचन...


  सोलापूर (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या आदर्श, सार्वभौम संविधानाचे सामुदायिक वाचन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर  सामुदायिक रित्या वाचन जनविकास क्रांतीसेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

      प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनविकास क्रांतीसेनेच्या वतीने उपस्थित महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी अंगद जाधव यांच्यासह  संविधानाची सामुदायिक वाचन केले.

        सदर प्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी केंद्रातील केंद्र सरकारने संविधानाचा गैरअर्थ लावून गोरगरीब, दिन दुबळे, व श्रमिक कामगार वर्गांला  देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी संविधान घरोघरी पोहोचविण्यासाठी आम्ही सामुदायिक संविधानाचे वाचन करीत आहोत असे म्हणाले. 



त्यानंतर आपले अध्यक्षीय मत व्यक्त करताना विष्णू कारमपुरी (महाराज) म्हणाले की संविधानाचा आधार घेऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार संविधान हटवण्याचा प्रयत्न करत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या संविधान विरोधी व देशद्रोही  सरकारला हटविल्या  शिवाय जनता जनार्दन  स्वस्त बसू नये, यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून  संपूर्ण देशवासीयांना आता संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

        सामुदायिक संविधान वाचन कार्यक्रमास ॲड. मुनीनाथ कारमपुरी,रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, प्रकाश डोंगरे, राधिका मिठ्ठा, यल्लाप्पा गायकवाड, सविता दासरी, आप्पासाहेब पवार, राणी दासरी, आशिष वाघमारे, लक्ष्मी गुंटला आनंद कोकणे, रंगरेज राजेंद्र, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई ईप्पा, दानम्मा कुरले,  सरुबाई कुरले, रामबाई माटेटी, लक्ष्मी रच्चा,  लक्ष्मी येमुल, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment