सारा न्यूज नेटवर्क -
जेष्ठ पत्रकार चंद्रकांत ऐवळे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांची उच्चस्तरीय अधिकारी मार्फत चौकशी करा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- सांगोला येथील जेष्ठ पत्रकार चंद्रकांत ऐवळे हे जेष्ठ पत्रकार असून गेली अनेक वर्षांपासून ते पत्रकरिता करत आहेत उभं आयुष्य वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज उठवून न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे दिनांक 20/11 2025 रोजी सांगोला येथील
पवारवस्तीमध्ये जमीन वादातून मारहाण, चोरी आणि गैरवर्तनाचा चंद्रकांत ऐवळे यांच्यावर एका महिलेच्या फिर्यादी वरून विविध कलमे लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जेष्ठ पत्रकार चंद्रकांत ऐवळे यांच्यावर मारहाण, शिवीगाळ, स्त्रीचा विनयभंग आणि सोन्याची माळ हिसकावून घेण्याचा आरोप करत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे महिलेने दिलेल्या तक्रारी वरून सांगोला पोलिसांनी क्र. ९२१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८(१), ११९(१), ११५ (२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जेष्ठ पत्रकार चंद्रकांत ऐवळे यांनी सांगोला तालुक्यातील दारू मटका जुगार अश्या अवैध धंद्या विरोधात नेहमीच लेखन केलं असून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करताना सांगोला पोलिसांनी शहनिशा तसेच चौकशी करायला हवी होती
जेष्ठ पत्रकारांवर अश्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होणे चिंतेची बाब असून या प्रकरणी उच्च स्तरीय अधिकारी मार्फत चौकशी व्हावी त्याच बरोबर जेष्ठ पत्रकार चंद्रकांत ऐवळे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे पाठीमागे घेण्यात यावेत म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर च्या जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे संभाजी गोसावी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment