Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 2, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

बुध्दीबळ विश्व - पी आर चेस वर्ल्ड च्या पृथा नीलकंठ ठोंबरे (१४९७) ला जागतिक बुद्धिबळ संघटने कडून आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त.


सोलापूर :- पी आर चेस वर्ल्ड अकॅडमीमध्ये ऑनलाइन पध्दतीने बुद्धिबळ शिकत असलेल्या बार्शीच्या पृथा नीलकंठ ठोंबरे हिला जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलल्या खुल्या फिडे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्के दिले. त्यामध्ये शिवम तम्हाने (१५५७) व मंदार कोरने (१५६१) यांना नमवीत तर देवांश तोतला (१५५४), मंगेश बोदडे (१५४०), अनाया गुप्ता (१६०१) रोही श्री मघम (१४८६), वर्णिका तविषा गंधम (१५१६) ह्यांच्या सोबत बरोबरी करीत *१४९७* असे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करून सोलापूर जिल्ह्यात ११ वर्षा खालील मुलींच्या वयोगटात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.


पी आर चेस वर्ल्ड अकॅडमीमध्ये ऑफलाइन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. "भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, दुबई, इंग्लंड, नॉर्वे, सौदी अरेबिया व श्रीलंका" या देशातही प्रशिक्षण देण्याचे काम पी आर चेस वर्ल्ड अकॅडमी करीत आहे. पृथाला आंतरराष्ट्रीय पंच व इंडिया बुक रेकॉर्ड होल्डर पवन क. राठी सर, नितीन अग्रवाल सर, वरिष्ठ राष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका रोहिणी तुम्मा मॅडम आणि राज्य पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका जयश्री कोंडा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि शाळेतील शिक्षक व पालकांनी तिच्या बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले आणि तिच्या उज्वल भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.!

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment