सारा न्यूज नेटवर्क
संत सहयोगाने मुक्ती मार्ग प्राप्त होतो
- ह.भ.प. मोहन कुरापाटी (महाराज)
सोलापुर :- दि. ३०/३/२६ :- संत सहयोगाने मुक्तीमार्ग प्राप्त होतो असे प्रबोधन ह.भ.प. श्री मोहन कुरापाटी महाराजांनी श्री दिगंबर मुनीनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत या विषयावरील तेलगू प्रवचनात प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना सांगितले*.
*श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांचा ५० व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ह.भ. प. मोहन कुरापाटी (महाराज) यांचे दिनांक २०/३/२०२६ ते २३/३/२६ असे तीन दिवस श्रीमद् भागवत या विषयावर तेलगू प्रवचन आयोजित केले त्याचबरोबर विविध धार्मिक , सामाजिक , सार्वजनिक भजन , कीर्तन , महापूजा , महाआरती आधी आयोजित करण्यात आले*.
*सदर प्रवचन कार्यक्रमास श्री दिगंबर मुनिनाथ पुण्यतिथी महोत्सव समितीचे पदाधिकारी श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाचे सर्व भाविक भक्तमंडळ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते*.
*पुण्यतिथी महोत्सवाचे मार्गदर्शक विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या उपस्थितीत झाले चौथ्या दिवसाचा कार्यक्रमास श्रीनिवास चिलवेरी , श्रीनिवास कुसुरकर , नागनाथ कारमपुरी , नागार्जुन कुसुरकर , महिला मंडळ अनुसुर्या कारमपुरी , सुनंदा कुसुरकर , प्रियांका कुसुरकर , पवित्रा कारमपुरी , रेणुका बुधारम , कौशल्या मुसकुर , लक्ष्मी गरदास , यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment