सारा न्यूज नेटवर्क -
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन..!
सोलापूर :- नॅब संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी नेतृत्वासाठी ओळखले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून सर्वत्र मानले जातात. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय कार्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला भक्कम दिशा मिळाली. त्यांच्या जयंतीनिमित्त १२ मार्च रोजी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार उपस्थित होत्या. या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.जोतिबा काटे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान असून ते स्वातंत्र्यसैनिक, दूरदृष्टीचे राजकारणी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment