Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 25, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

इंगळगी झेडपी शाळेला आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून ८ लाखांचा निधी!


दक्षिण सोलापूर :- दि.25- इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या प्रयत्नातून तब्बल ८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो निधी प्राप्तही झाला आहे. पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


या निधीतून शाळेतील पहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गासाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, प्रत्येक वर्गासाठी संगणक, शिक्षकांसाठी टेबल-खुर्च्या, तसेच मुख्याध्यापकांसाठी सुसज्ज कार्यालयीन साहित्य देण्यात येणार आहे. याशिवाय शाळेसाठी विशेष एलईडी स्क्रीन बोर्डचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व साहित्य खरेदी संबंधित संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आली असून येत्या आठवडाभरात शाळेत त्याचे वितरण होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक दर्जात मोठी भर पडणार आहे.


या उपक्रमाबद्दल इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे, उद्योजक शिवानंद हत्तुरे, पत्रकार राहुल वंजारे, भाजप सोशल मीडिया प्रमुख सागर धुळवे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षकांनी आमदार सुभाषबापू देशमुख यांचे आभार मानले आहेत. तसेच ग्रामस्थांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment