Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, March 30, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

रस्ते डांबरीकरणासाठी सैफुल येथील ज्येष्ठ नागरिकांचे उपमहापौरांना साकडे.. 


सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील सैफुल येथील वैष्णवीनगर (भाग १ व २) मधील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना चालणेही मुश्कील झाले असून, या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण क्ररावे, अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या भागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येते. वाहनांमुळे अंगावर चिखल उडतो व अपघाताचा धोका वाढला आहे. येथील ७० ते ७५ कुटुंबे महापालिकेचा १०० टक्के कर नियमित भरतात, तरीही त्यांना सुविधा मिळत नाहीत.

गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असताना जनता दरबारात वारंवार साकडे घालूनही केवळ आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याचा संताप निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.


उपमहापौरांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे,अशी मागणी ज्येष्ठ नागरिक प्रमुख व्ही. आर. लोहार, खंडू काळे, संजय शिरसाट, नारायण महिंदकर आणि रणजित सावंत आदींनी केली आहे. यावेळी दक्षिण सोलापूर भाजप समन्वय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष महेश देवकर हे उपस्थित होते. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment