Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 4, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

महावितरण कार्यालयात लाईनमन दिन मोठ्या उत्साहात साजरा. 

महावितरण कार्यालयात लाईनदिन निमित्ताने सुनिल काळे यांचा सत्कार.


सोलापूर :- केंद्र सरकारने ४ मार्च हा दिवस लाईनमन दिन म्हणून घोषित केला असून त्या अनुषंगाने महावितरण शहर विभाग सोलापूर यांच्या वतीने स्काडा सेंटर सोलापूर येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

       सोलापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनिल माने ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

    



   यावेळी सोलापूर ग्रामीण विभाग कार्यकारी अभियंता मनिषकुमार सूर्यवंशी, शहर विभाग उपव्यवस्थापक विधी कांबळे मॅडम, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, संजीवकुमार कोंडगुळी, हेमंत ताकपिरे, सुरेश मैलापुरे, अशोक निशाणदार, उपकार्यकरी अभियंता नागनाथ गयाळे, आशिष खेडेकर आदी मंचावर उपस्थित होते. लाईनमन दिन निमित्ताने सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिले.


       याप्रसंगी उत्सवमूर्ती, प्रकाशदूत म्हणून सुनिल काळे, निलकंठ कांबळे, महेबूब बागवान, श्रीकांत तोटदार, गणेश बसवंती, रमेश कुंभार, अमजद पठाण, संतोष कुंभार, सचिन कानडे, नंदकुमार मार्तंड, दिनेशकुमार बळवंत, सुनिल वाघमोडे, अनिल हब्बू, मद्दसर तोडलबाग, स्वप्निल कोरे, अजिंक्य खिलारे, शोभा पाटकर, प्राजक्ता राऊतराव, जनबाई येलगुंडे, निर्मला पाटकर यांच्यासह उपकार्यकरी अभियंता, सहाय्यक अभियंता व इतर जनमित्र, बाह्यस्रोत कर्मचारी, प्रकाशदूत मोठया संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिश सोनवणे, महेश माने, अंबादास मोरे, सलीम शेख, दिलीप शेटे, विश्वजीत बंडगर, आनंद डोंगरे, अस्लम तांबोळी, सुजाता शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment